कोल्हापूर

सावे येथे आढळला डुरक्या घोणस जातीचा साप

Durkya Ghonas snake | हा साप पूर्णपणे बिनविषारी असला तरी त्याची राखट त्वचा व पांढरे ठिपके यामुळे त्याला विषारी समजले जाते

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : सावे (ता. शाहुवाडी ) येथून शाहूवाडी वन्यजीव पथकातील युवकांनी दुर्मिळ अशा डुरक्या घोणस जातीच्या सापाला पकडले. त्याला तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगलामध्ये सुरक्षित सोडून जीवदान दिले.

सविस्तर वृत्त असे की, सावे येथील हायस्कूलला लागून असलेल्या कंपाउंडच्या भिंतीमध्ये कर्मचारी बाबासो पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूला दोन ते तीन दिवसापासून दुर्मिळ साप आढळून येत होता. दुर्मिळ जातीच्या सापामुळे संपूर्ण कुटुंब दोन दिवसापासून अस्वस्थ होते. परंतु वन्यजीवांचे संरक्षण करणाऱ्या किरण खोत व वन्यजीव पथकातील शिवाजी पाटील यांना सदरची माहिती देण्यात आली. यांच्या टीमने दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सुमारे अडीच फूट लांब व जाडजूड डुरक्या घोणस जातीच्या सापाला पकडण्यात आले.

दूर्मिळ साप . . .

हा साप जाड कातडीचा असून शक्यतो जमिनीखाली रहिवास असतो. वेग अतिशय मंद असून जमिनीतील मोठी गांडुळे व अन्य छोट्या प्राण्यांना भक्ष्य बनवतो. या सापाची लांबी कमी असून इतर सापाप्रमाणेच सुमारे सहा आठ ते 10 अंडी घालून अन्य पिलांना जन्म देतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी असला तरी त्याची राखट त्वचा व पांढरे ठिपके यामुळे त्याला विषारी समजले जाते. अशी माहिती सर्पमित्र व वन्यजीव रक्षक किरण खोत यांनी दिली. या मोहिमेमध्ये किरण खोत, शिवाजी पाटील, रोहित पाटील ,अविनाश पाटील, सुरेश पाटील, तुकाराम थोरवे यांनी सहभाग घेतला व दुर्मिळ अशा डुरक्या घोणस जातीच्या सापाला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT