Accident  
कोल्हापूर

Kolhapur Accident | पुणे- बंगळूर महामार्गावर शिये फाटा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार!

पुढारी वृत्तसेवा

शिरोली पुलाची : पुणे बंगळुरू महामार्गावरील शिये फाटा येथे बेदकारपणे वाहन चालवून टेम्पो चालकाने पाठीमागून सीडी डीलक्स होंडा मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल चालक सौरभ सुरेंद्र फडतरे वय (२८राहणार हरळी तालुका गडहिंग्लज हा युवक ठार झाला) हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सकाळी सव्वाआठ चे सुमारास सौरभ सुरेंद्र फडतरे (वय २८) राहणार मूळ हरळी हा सीडी डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच ०९-इ बी २३४३ वरून पुणे दिशेने निघाला होता. दरम्यान पाठीमागून येणारा टेम्पो क्रमांक के ए २७ _ ३९५७ याने फडतरे याला धडक दिली.

टेम्पो चालक रुद्रगोंडा चन्नप्पागोंडा होसमणी (वय ३४ राहणार_कनेनायकनकोप्पा तालुका. कलघटगी जिल्हा धारवाड याने बेदकारपणे निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याचे कडेने जाणाऱ्या सीडी होंडा चालकास पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. यामध्ये होंडा चालक सौरभ याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अतुल पवार कोल्हापूर यांनी दिली असून अधिक तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सपोनी सुनील गायकवाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT