Campus to Career Pudhari
कोल्हापूर

‌Campus To Career 2026: ’पुढारी‌’च्या सहकार्याने मिटणार करिअरची चिंता

Pudhari Campus to Career 2026: येत्या 6 जूनला कोल्हापूरमध्ये ‌’पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ उपक्रमाचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Campus to Career 2026

पुणे : विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी आता जास्त दिवस वाट पहाण्याची आवश्यकता नाही. तीनच दिवसांमध्ये अर्थात येत्या 6 जूनला ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहातर्फे ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ या विशेष उपक्रमाला सुरुवात होत आहे. 6 ते 29 जूनदरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये पार पडणाऱ्या या उपक्रमासाठी पूर्वनावनोंदणी अनिवार्य असून, या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे.

या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याच मार्गदर्शनाच्या आधारे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल किंवा करिअरच्या नव्या वाटा आणि सुवर्णसंधी याविषयी निवड करण्याची संधी मिळणार आहे.

करिअरनिवडीसाठी योग्य मार्गदर्शन हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय खासगी विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा, त्यांची प्रक्रिया आणि संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. शासन व खासगी शिष्यवृत्ती योजना, तसेच शैक्षणिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया यावरही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, त्यांची अचूकता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे. त्यामुळे ‌‘पुढारी कॅम्पस टू करिअर‌’ अंतर्गत आयोजित हे सेमिनार करिअर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहेत.

काय आहे ‌‘पुढारी कॅम्पस टु करिअर‌’

  • बारावीनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन.

  • करिअरनिवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन.

  • खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती.

  • शासन व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती.

  • शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.

सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी

विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी या 95700 17003 मोबाईल क्रमांकावर संपर्क करा

सोबत दिलेल्या लिंकवर https://pudharievent.campusdekho.ai क्लिक करा.

सायबर सिक्युरीटी आणि इंटरनेटचा वापर करत असताना घ्यायची काळजी, याविषयी विद्यार्थ्याना माहिती देऊन या क्षेत्रात करिअरच्या असलेल्या नवनविन संधीविषयी विद्यार्थ्यांना अवगत करायचे आहे. इथीकल हॅकिंग, मालवेअर ॲनालिसिस या नवीन संकल्पना तसेच कंपन्यांना सायबरविषयक नेमके कशा प्रकारच्या मनुष्यबळाची गरज आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडणार आहे.
- प्रा. मोहित शेवकर, सहाय्यक प्राध्यापक, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ
तंत्रज्ञानाच्या युगात तुमची व्यक्तिगत सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. सायबर, डिजीटल तंत्रज्ञान, फॉरेन्सिक सायन्स आदींमधील करिअरविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
- मुकेश अगरवाल, प्रवेश विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

केव्हा : शनिवार, 6 जून 2026

कुठे : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हॉल, कोल्हापूर

वेळ : सायं. 4 ते 6.30

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT