गॅस दरवाढ कमी करा, अन्यथा पंपावर हल्लाबोल 
कोल्हापूर

Kolhapur News : गॅस दरवाढ कमी करा, अन्यथा पंपावर हल्लाबोल

जिल्हा वाहनधारक महासंघाचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षासह आक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गॅस दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने मंगळवारी (दि. 24) दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रिक्षांसह आक्रोश मोर्चा काढला. गॅस कंपन्यांनी मनमानी कारभार थांबवावा, दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा पंपावर हल्लाबोल करू, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना दिले.

यावेळी विजय देवणे यांनी एलपीजी व सीएनजी गॅस दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे रिक्षा व्यवसायावर आर्थिक संकट आले आहे. गॅसचा 42 रु.चा दर 85 रु. केला. कृत्रिम टंचाई करून जनतेला लुटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत गॅसचे दर सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडेकर, राहुल पोवार आदी उपस्थित होते.

गॅस घेणार किलोने, विकणार लिटरने

चंद्रकांत भोसले म्हणाले, गॅस कंपनीला शासनाकडून किलोच्या दराने गॅस मिळतो. परंतु कंपनी लिटरच्या दराने गॅस देते. एक तर किलोप्रमाणे दर घ्यावा, अन्यथा लिटरने गॅस देणार असतील तर गॅस दर कमी करावा. ज्या कंपन्या दर कमी करणार नसतील त्यांच्यावर कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT