कोल्हापूर : नीटपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरसीसी क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली. याचे पडसाद मंगळवारी कोल्हापुरात उमटले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोटेगावकर यांचा निषेध केला. व्हीनस कॉर्नर परिसरातील Šलासच्या सर्व बोर्ड ना काळे फासून ते बोर्ड फाडून टाकले.
शिवसेना शहरप्रमुख मंजित माने म्हणाले, मोटेगावकर सारख्या लोकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांच्या संपत्ती कायमच्या सील केल्या पाहिजेत. पेपर फुटी सातत्याने होणे सरकारचे मोठे अपयश आहे. यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, युवा सेना शहर प्रमुख सुमित मेळवंकी, समन्व्यक अक्षय घाटगे, शुभम पाटील, ऋषीं जोशी, तालुका प्रमुख योगेश लोहार, फिरोज मुल्लानी, कनिष्क शिंदे, मयुरेश भिर्डीकर आदी उपस्थित होते.
मोटेगावकर यांच्या शाहूपुरीतील बंद असलेल्या Šलासच्या ठिकाणी मंगळवारी दिवसभर पालकांची मोठी वर्दळ होती. काहीजण Šलास कधी उघडणार याबाबत विचारणा करत होते. चालू शैक्षणिक वर्षासाठी काही पालकांनी फी भरल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती.
कोल्हापुरात अनेक अकॅडमी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊ नका, आमचं कॉलेजशी टायअप असल्याचे सांगतात. पालकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना कॉलेजला न बसण्यास प्रवृत्त करणाऱ्या अकॅडमीना टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.