मागण्यांचा विचार न झाल्यास १ जुलैपासून बेमुदत आंदोलन  
कोल्हापूर

ST employees protest : मागण्यांचा विचार न झाल्यास १ जुलैपासून बेमुदत आंदोलन

एस.टी. कर्मचाऱ्यांचा इशारा; मध्यवर्ती बसस्थानकात निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने सोमवारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात निदर्शने केली. प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. तब्बल एक तास घोषणाबाजी सुरू होती. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करा, सातव्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करा, थकीत वेतनवाढ व महागाई भत्त्याची रक्कम अदा करा, घरभाडे भत्ता लागू करा, एस.टी. महामंडळासाठी राज्य अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करा, तसेच रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया राबवा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

यावेळी एस.टी. कामगार संघटनेचे सुभाष सुतार, उत्तम पाटील, जयवंत भोसले, सुनील दळवी, कामगार सेना संघटनेचे संदीप घाटगे, नामदेव रोडे, सुरेश माने, कर्मचारी काँग्रेस संघटना संजीव चिकुर्डेकर, सुनील घोरपडे, वर्कर्स कामगार काँग्रेस इंटकचे विजय बरगे, राकेश कांबळे, बहुजन परिवहन कर्मचारी संघटनेचे संदीप परीट, संजय कदम, महिला प्रतिनिधी सारिका शिंदे, शबाना शेख यांच्यासह कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT