म्हाकवे : म्हाकवे ता कागल येथील दादासाहेब पांडुरंग पाटील- भडगावकर यांच्या नारळ,आंब्याच्या बागेला अज्ञाताने लावलेल्या आगीत १५ हून अधिक आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. यामुळे पाटील कुटुंबियाचे ५० हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावच्या उत्तरेला म्हाकवे मत्तिवडे रस्त्यालगत असणार्या आंब्याच्या बागेला आग लागल्याचे रणजित गंगाधरे यांना दिसले. त्यांनी तात्काळ पाटील यांना सांगितले. त्यामुळे या कुटुंबियासह गावातील काही युवकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी श्रीरंग पाटील, विशाल चौगुले,शिवाजी पाटील, नितीन पाटील,अमित पाटील यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, पाटील यांची काही दिवसांपूर्वी विहिरीवरील दोन मोटरी तसेच केबलही चोरीला गेली होती. त्याचबरोबर बागेतील फळेही चोरीला जात होती. तर आता घडलेल्या आग लावण्याच्या कृत्याबाबत संताप व्यक्त होत आहे.