Kolhapur Crime News 
कोल्हापूर

Kolhapur Crime : भावाचा वाद झाला...थेट तलवारच उगारली; तरुणाला अटक

आर.के.नगर परिसरातील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आर.के.नगर परिसरात तरुणांबरोबर भावाचा वाद झाल्याचे समजताच थेट तलवार उगारून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश जयहिंद इंद्रेकर (वय २०, रा. कंदलगाव नाका) असे त्याचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. गुन्ह्यातील तलवारही पोलिसांकडून जप्त करण्यात आली. रविवारी संशयित इंद्रेकर याच्या भावाचा आर. के. नगर परिसरातील तरुणासोबत वाद झाला होता. याची माहिती ऋषिकेशला समजली. त्याने घरातून तलवार दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT