जवान मच्छिंद्र घोटणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 
कोल्हापूर

kolhapur News : जवान मच्छिंद्र घोटणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

ठाणेवाडी गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : कागल तालुक्यातील ठाणेवाडी येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान मच्छिंद्र दिलीप घोटणे (वय ३५) यांचे आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ठाणेवाडी येथे अत्यंत शोकाकुल आणि जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान मच्छिंद्र घोटणे हे सन २०१२ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते . १४ वर्षे त्यांनी देशसेवेत अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले. त्यांना ब्रेन ट्यूमटर झाल्याने त्यांच्यावर दोन वर्षापासून पुण्याच्या कमांड हॉस्पीटलमध्ये उपचार चालू होते . रविवार (दि.१४) रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे ठाणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. आज सोमवारी (दि .१५ ) सकाळी त्यांचा मृतदेह पुण्याहून ठाणेवाडी येथे आणण्यात आला. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT