कोल्हापूर : हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनींग मिल्स येथे तणावाचे वातावरण आहे. आवाडे समर्थक कंपनीच्या गेटवर जमले असून त्यांनी जेसीबी थेट कंपनीच्या गेटवर आणला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी स्वतः डीवायएसपी आणि इतर अधिकारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाले आहेत. कंपनीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे काल कुलूप तोडून आत घुसले होते. कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा म्हणत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज पुन्हा कंपनी बाहेर मोठी गर्दी जमली आहे.