Kolhapur Rain  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain : कोल्हापुरात पाऊस : बळीराजा सुखावला : आठ दिवस राज्यात मुसळधारेचा इशारा

रत्नागिरी, सिंधुदुर्गात मान्सूनच्या कोसळधारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे /कोल्हापूर : महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांची ज्या मान्सूनच्या जलधारांकडे आस लागली होती, तो मान्सून अखेर सोमवारी जोरदार बरसला. त्याने गोव्यापासून जलधारांची बरसात केली. तो रत्नागिरीत दिवसभर धो-धो कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिंब करीत कोल्हापूरमध्ये बरसला आणि त्याने पुण्याकडे कूच केली. अल निनोचे अडथळे पार करत अखेर सोमवारी सकाळी मान्सून पुणे शहरात दाखल झाला.

मान्सूनने आता वेग धरला असून आनंदघनांच्या बरसातीने वातावरणात गारवा निर्माण झाला. मान्सूनच्या आगमानाने बळीराजा सुखावला आहे. यंदा तो तब्बल १५ दिवस उशिरा आला. मान्सूनचा वेग पाहता आगामी ४८ तासांत तो मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले पंधरा दिवस मान्सून बारामती, हरणाई, सोलापूर भागात थबकलेला होता.

अशी आहे स्थिती

  • मान्सूनची रेषा पुणे, अलिबाग, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, निजामाबाद, दंतेवाडा, बालंगीर, सुंदरगड, चतरा, गया, मुझफ्फर, बिहार, ओडिशा या भागातून जात आहे.

  • आगामी ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT