Gokul election |  
कोल्हापूर

Gokul Election : ६४४ दूध संस्थांच्या अवसायन कारवाईविरोधात न्यायालयात धाव

निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत अपात्र ठरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील ६४४ दूध संस्थांवर करण्यात आलेल्या अवसायन कारवाईला आता न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. भुदरगड तालुक्यातील फणसवाडी येथील श्री हनुमान दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. यावर मंगळवारी (दि. २३) सुनावणी होणार आहे.

गोकुळचे सभासदत्व मिळालेल्या कोणत्याही दूध संस्थेला केवळ दूध संकलन कोटा, संचालक मंडळाची निवडणूक, वार्षिक सभा किंवा लेखापरीक्षण या कारणांवरून अवसायनात काढता येणार नाही. पूर्णपणे बंद असलेल्या किंवा लेखापरीक्षण न झालेल्या संस्थांवरच अशी कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ मतदानाचा अधिकार डावलण्यासाठी अवसायनाची कारवाई करणे चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दूध संस्था नोंदणीसाठी शासनाची परिपत्रके आहेत; मात्र नोंदणीकृत संस्था शासन निकषापेक्षा कमी दूध संकलन करत असल्यास त्या बंद करणे किंवा अवसायनात घेण्याबाबत कोणतेही स्वतंत्र परिपत्रक उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिदिन एक लिटर दूध संकलन करणाऱ्या सर्व नोंदणीकृत संस्थांना गोकुळ निवडणुकीत मतदानास पात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT