कोल्हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा (एसएमपीएस) हॉस्पिटलचे संघवी पोपटलाल शहा यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलतर्फे एकदिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिरात रुग्णांना जनरल तपासणी, ई.सी.जी. ॲडमिट सुविधा, इंजेक्शन, औषधे तसेच संपूर्ण रक्ताची तपासणी, दंतरोग व डोळे तपासणीसह सर्व उपचार मोफत देण्यात आले. समाजामध्ये आरोग्य व स्वास्थ्याचा प्रसार व्हावा, रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
एसएमपीएस हॉस्पिटलचे रौनक शहा यांनी डॉ. जाधव यांची पुढारी कार्यालयात भेट घेऊन त्यांना हॉस्पिटलच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तसेच हॉस्पिटलमध्ये डॉ. रवींद्र वराळे, डॉ. प्रकाश चौगुले, डॉ. प्रशांत पाटील यांनी संघवी पोपटलाल शहा यांना शुभेच्छा दिल्या.