सरवडे : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेतजमीन गमावण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सरवडे येथे तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन करत शासनाविरोधात एल्गार पुकारला. राधानगरी तालुका बहुजन विकास संघटना आणि बाधित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मंत्र्यांना या भागात फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.