कोल्हापूर

kolhapur News | बेंदरादिवशीच बैलाचा मृत्यू ! कुरणी येथील घटनेने ग्रामस्थ हळहळले!

मिरवणूकीसाठी आणलेल्या बैलाचा आकस्मित मृत्यू, विधीवत अंत्यसंस्कार करून पुरले, अनेकांना अश्रू अनावर!

पुढारी वृत्तसेवा

भडगाव: बेंदूर सण म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबरीने कष्ट करणारा व बैला प्रति आदरभाव व्यक्त करणारा सण बेंदूर पण याच दिवशी काल सोमवारी बेंदूर सणा दिवशीच‌‌ मिरवणूकीसाठी आणलेल्या बैलाचा अकस्मित मृत्यू झाल्याची घटना कुरणी येथे घडली आहे.

कुरणी (ता.कागल) गावात बेंदूर सणा दिवशी कर तोडण्याची मोठी परंपरा होती. परंतु गेल्या काही वर्षापासून ही कर तोडण्याची परंपरा गावात स्थगित करण्यात आली आहे. त्या ऐवजी बैलांना सजवून संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा कायम आहे.

या वर्षी देखील गावातील एस.पी स्पोर्ट्स या मंडळांने सुमारे ८० हजार रुपये खर्चाचा पांढरा शुभ्र देखणा बैल खरेदी केला होता.दि.२९ रोजी बैलांचा अचानक मृत झाल्याचे समजले आणि संपूर्ण गावकऱ्यांचा हिरमोड झाला. बेंदुर सणा दिवशी करतोडी दिवशीच अशी घटना घडली आणि कुरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बैल एस.पी स्पोर्ट्स मंडळाकडून पंधरा दिवसांपासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती. त्याच्या खाण्या-पिण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले होते.

मिरवणुकीसाठी ३० हजार रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आले होते. तसेच मंडळाच्या सदस्यांनी टी-शर्ट छापून घेतले होते. नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती.मात्र, बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत अवस्थेत आढळला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

बैल मृत झाल्याचे समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहो फोडला. अनेकांना अश्रू अनावर झाले. यानंतर बैलावर विधीवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आले. बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले. गावातील यंदाचा बेंदूर सण अत्यंत शांत आणि शोकमय वातावरणात पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT