Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News : पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा राजाराम बंधाऱ्यात बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : पोहण्यासाठी राजाराम बंधारा येथे वडिलांबरोबर गेलेल्या दोन भावांपैकी उज्वल गंगाराम बडगे (वय. 12, मुळ रा. गोकाक, सध्या रा. कसबा बावडा) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी, फरशी जोडण्याचे काम करणारे गंगाराम बडगे कसबा बावडा येथे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मंगळवारी ते दोन्ही मुलांना पोहण्यासाठी राजाराम बंधारा येथे घेऊन गेले होते. दरम्यान लघुशंका आल्याने ते पाण्याबाहेर आले. याच दरम्यान उज्वल मोरीतून वाहत गेला खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला.

बंधाऱ्याजवळ असणाऱ्या राहुल भोजणे व इतर तरुणांनी पाण्यात सुर मारत शोध सुरु केला. शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी मुलाला पाण्याबाहेर काढले. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. निवास जाधव, आशिष माळी आणि सुशांत पोवार यांनी बेशुद्धावस्थेत त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT