टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू  
कोल्हापूर

Kolhapur Accident : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हमिदवाडा कारखाना पेट्रोल पंपासमोर अपघात

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : मुरगूड - निपाणी मार्गावर हमिदवाडा साखर कारखाना पेट्रोल पंपासमोर टेम्पोने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार अशोक यशवंत माळी (वय ४५, रा सदाशिवनगर, हमिदवाडा -बस्तवडे) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हमिदवाडा येथील पेट्रोल पंपासमोर चारचाकी थांबली होती. त्यावेळी एका प्रवाशासोबत गाडीचालकाचा वाद सुरू होता. त्याचवेळी त्यांना चुकवण्यासाठी भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने (केए २३ बी ८०११) चारचाकीला मागून धडक देऊन समोरून आपल्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलस्वारास जोराची धडक दिली. यामध्ये अशोक माळी यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अशोक माळी हे हॉटेल व्यावसायिक होते. सध्या त्यांच्या हॉटेलचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी ते मोटासायकलवरून साहित्य घेऊन येत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT