वाशी : पिरवाडी येथे कारवाईदरम्यान मध्यभागी बोगस डॉक्टर कृष्णात गोडसे. शेजारी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मस्के, आरोग्य सहायक अनिल पोवार व इतर. 
कोल्हापूर

Bogus Doctor Case : पीरवाडी, वाशी येथील दोन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश

कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने टाकले छापे

पुढारी वृत्तसेवा

वाशी : कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने मंगळवारी वाशी परिसरात छापे टाकत पिरवाडीतील कृष्णात गोडसे व वाशीतील कृष्णात येवले या दोन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मस्के, आरोग्य सहायक अनिल पोवार आणि आरोग्य सेवक सागर चव्हाण यांच्या पथकाने छापे टाकले. आपल्याकडे मान्यताप्राप्त पदवी नसल्याची कबुली दोन्ही संशयितांनी दिली. 26 मेपासून कोणत्याही प्रकारची ओपीडी किंवा उपचार करणार नसल्याची लेखी हमी त्यांनी घेतली.

मला गावानेच डॉक्टर केले

फक्त 12 वी शिकलेला गोडसे 1995 मध्ये एका खासगी दवाखान्यात कम्पाउंडर म्हणून कामाला होता. त्या अनुभवावरून गावकऱ्यांनीच मला उपचार करण्याची विनंती केली आणि गावानेच मला डॉक्टर केले, अशी अजब कबुली चौकशीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर दिली.

माझ्या औषधांमुळे गुण येतो

कृष्णात येवले याने माझ्या औषधांनी रुग्णांना गुण येत असल्याने लोकांचा माझ्याकडे ओढा होता, असे सांगत आपल्या बोगसगिरीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

दैनिक ‌‘पुढारी‌’वर अभिनंदनाचा वर्षाव

वाशी आणि परिसरात बोगस डॉक्टरांबाबत दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या बोगसगिरीला ‌‘पुढारी‌’ने वाचा फोडल्यामुळे ‌‘पुढारी‌’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT