अनुराधा कदम
कोल्हापूर : शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांचा ओघ वाढला आहे. दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून सुरक्षा व सुविधा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
शहरात एकूण 64 ठिकाणी स्वच्छतागृहे
प्रत्येक पार्किंग ठिकाणी 1 मोबाईल टॉयलेट
दुर्गंधीनाशक फवार्याने दिवसातून 3 वेळा स्वच्छता मोहीम
भवानी मंडप पागा बिल्डिंग
मेन राजाराम हायस्कूल
कपिलतीर्थ मार्केट, व्हीनस चौक,
गाडी अड्डा,
निर्माण चौक
गांधी मैदान
बाबूजमाल रोड
* पुणे, सातारा, सांगलीकडून येणारी वाहने तावडे हॉटेल, दसरा चौक, बिंदू चौक पार्किंग, दसरा चौक किंवा व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा येथे येतील.
* कर्नाटकातून कागल मार्गे येणारी वाहने सायबर चौक, माउली पुतळा, गोखले कॉलेजमार्गे शिवाजी स्टेडियमवर, पेटाळा मैदान पार्किंगवर येतील.
* गारगोटी, कोकण मार्गे येणारी वाहने संभाजीनगर नंगीवली चौक, लाड चौकातून गांधी मैदान पार्किंग स्टाईल येतील.
* राधानगरीमार्गे येणारी वाहने क्रशरचौक, लाड चौकातून गांधी मैदान पार्किंगस्थळी येतील
* कोकण, गगनबावडा मार्गे येणार्या वाहनांचे पार्किंग रंकाळा, संध्यामठ परिसरात
ताराबाई रोड बहुमजली पार्किंग
(क्षमता : 240 दुचाकी व 75 चारचाकी)
बिंदू चौक
व्हीनस कॉर्नर
गाडी अड्डा
शिवाजी स्टेडियम
प्रायव्हेट हायस्कूल मैदान
मेन राजाराम हायस्कूल आवार
दिलबहार तालीम परिसर
पेटाळा मैदान
गांधी मैदान
शाहू दयानंद हायस्कूल परिसर
पंचगंगा घाट परिसर
तांबट कमान, रंकाळा परिसर
खानविलकर पंप मागील शंभर फुटी रस्ता
* 120 सीसीटीव्ही कॅमेरे
* 5 डीएफएमडी, 5 एचएमडी
* 15 वॉकी-टॉकी
* 3 एक्स-रे बॅग स्कॅनर
* 1 ड्रोनद्वारे देखरेख
* पोलिस यंत्रणा
* 3 पोलिस निरीक्षक
* 30 सहायक पोलिस उपनिरीक्षक
* 150 पोलिस कॉन्स्टेबल
* 70 महिला पोलिस
* 50 होमगार्ड
* 2 राज्य राखीव दल पथक
* 2 शीघ्र कृतिदल तुकड्या