कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील नावली गावात घरगुती वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते यांनी आपला मेहूणा विनोद अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत विनोद पाटील गंभीर जखमी झाले असून गोळी मांडीत घुसली आहे. त्यांना तातडीने कोडोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.