Kolhapur municipal election File Photo
कोल्हापूर

Kolhapur municipal elections: सतेज पाटील काँग्रेस कमिटीत, क्षीरसागर शिवालयात, मुश्रीफ मुंबईत, महाडिक दिल्लीत

महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखत घेतल्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग््रेास कमिटती इच्छुकांच्या मुलाखत घेतल्या. त्यानंतर अजिंक्यतारा कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपल्या शिवालयामध्ये वीस प्रभागांचा आढावा घेतला. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबईत असून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना व्हीप आल्यामुळे ते दिल्लीला गेले आहेत.

आमदार सतेज पाटील मुलाखतीत

निवडणूक जाहीर होताच काँग््रेासने आपल्या हालचाली गतीमान केल्या आहेत. काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग््रेासकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारपासून सुरुवात केली आहे. काँग््रेास कमिटीमध्ये या मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या मुलाखती सायंकाळपर्यंत सुरू होत्या. दरम्यानच्या काळात आमदार पाटील यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चाही केली. दुधवडकर यांनी आपला प्रस्ताव पाटील यांच्याकडे दिला. मुलाखती संपल्यानंतर आ. पाटील यांनी आपल्या अजिंक्यतारा कार्यालयात काही प्रभागांमधील निवडक कार्यकर्त्यांशी महापालिकेच्या निवडणुकीबाबत रात्री अशिरापर्यंत चर्चा केल्या.

मंत्री हसन मुश्रीफ मुंबईत

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते मंत्री हसन मुश्रीफ मुंबईला गेल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मंगळवारी फारशा हालचाली होऊ शकल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील हे देखील आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमात होते. बुधवार पासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहेत.

आ. राजेश क्षीरसागर यांनी घेतला 20 प्रभागांचा आढावा

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. 16) कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने 20 प्रभागांचा आढावा घेतला. महायुतीतीमधील तुल्यबळ आणि सक्षम उमेदवारांवर अन्याय होऊ यासाठी दक्षता घेतली जात आहे. महायुतीची सत्ता येण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा केली. महायुतीमधील कोणते उमेदवार कोणत्या प्रभागात निवडूण येऊ शकतात? याची चाचपणी करून त्यादृष्टीने जागा वाटपात भुमिका घेण्यासाठी पावले उचलण्यात आली.

कोल्हापुरच्या विकासासाठी व्हिजन ठरविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलाव संवर्धन, विद्युत रोषणाई, पंचगंगा घाट संवर्धन, कन्व्हेंशन सेंटर, महापालिकेतील सातशेहून अधिक कर्मचारी कायम करणे आदीसह इतर कामे जनतेसमोर मांडावीत, असे शिवसैनिकांना सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT