Kolhapur Municipal Budget | कोल्हापूर महापालिकेचा 1500 कोटींचा अर्थसंकल्प Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Municipal Budget | कोल्हापूर महापालिकेचा 1500 कोटींचा अर्थसंकल्प

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा 2026-27 चा तब्बल 1,497.49 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांना बुधवारी (दि. 25) सादर केला. दरम्यान, 30 मार्च रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष महासभा आयोजित केली आहे. सभापती शिराळे महासभेत अर्थसंकल्प सादर करतील.

आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी 2025-26 या आर्थिक वर्षात परीख पूल येथे 2.25 कोटींचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला. घरफाळा व पाणीपट्टी दंडात सवलत दिली. त्याचा 8 हजार 480 मिळकतधारकांनी लाभ घेतल्याने 9.37 कोटी जमा वसूल झाले. 19 हजार 664 नळ कनेक्शनधारकांनी सवलत योजनेचा लाभ घेतल्याने 3.90 कोटी वसूल झाले. ई-बसेससाठी विविध कामे 70 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले.

महसूली अपेक्षित जमा : 754.71 कोटी

महसुली अपेक्षित खर्च : 754.54 कोटी

भांडवली अपेक्षित जमा : 268.17 कोटी

भांडवली अपेक्षित खर्च : 267.03 कोटी

विशेष प्रकल्पांतर्गत जमा : 418.67 कोटी

विशेष प्रकल्पांतर्गत खर्च : 418.39 कोटी

केंद्रीय वित्त आयोगांतर्गत जमा : 55.94 कोटी

केंद्रीय वित्त आयोगांतर्गत खर्च : 55.94 कोटी

महसुली, भांडवली एकूण : 1497.49 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT