Kolhapur Municipal Corporation Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय जनगणनेनंतर

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय आता 2027 नंतर घेतला जाणार आहे. जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे हद्दवाढीचा निर्णय घेण्याबाबत मर्यादा आल्या आहेत. मंगळवारी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली. कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात शिंदे शिवसेनेचे सदस्य राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला त्यांनी वरील उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

हद्दवाढीचा निर्णय हा धोरणात्मक असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय केला जाईल, असे सांगतानाच 2027 नंतर लवकरात लवकर हद्दवाढीचा निर्णय घेण्याचे आश्वासनही मिसाळ यांनी दिले.

सर्व महानगरपालिकांसाठी सामायिक नियमावली

कोल्हापूर महापालिकेच्या आकृतिबंधासंदर्भातही प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून, सर्व महानगरपालिकांसाठी सामायिक नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. ती अंतिम झाल्यानंतर संबंधितांना मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT