कोल्हापूर

कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव

मोहन कारंडे

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : वाचकांच्या मनावर गेली ७५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे दैनिक 'पुढारी' कोल्हापूर शहरातील वाचकांना नववर्षाची अनोखी भेट देणार आहे. शहरातील वाचकांवर तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसांसह लकी ड्रॉमार्फत दोन नशिबाची बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे, तीही बुकिंग रकमेशिवाय उपलब्ध होणार आहे.

दैनिक 'पुढारी' म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे 'पुढारी' असे वर्षानुवर्षांचे अतूट नाते आहे. पत्रकारिता आणि सार्वजनिक क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केलेला 'पुढारी' वाचकांचा खरा आधारस्तंभ आहे. वाचकांच्या समस्यांना वाचा फोडत, त्यांना न्याय मिळवून देण्यात 'पुढारी'ची सातत्याने आग्रही आणि अग्रणी भूमिका राहिली आहे. भक्कमपणे सोबत उभा राहिलेल्या 'पुढारी'मुळे शहरावरील अन्यायी टोलचे भूत गाडण्यात कोल्हापूरवासीयांना यश आले. शहराच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 'पुढारी'ने वाचकांच्या भूमिकेला बळ देत, तो प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाचक आणि 'पुढारी'ची असलेली वीण दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे.

वाचकांच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक लढ्यात पुढे असणारा 'पुढारी' वाचकांनाही भरभरून देण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यातूनच 'पुढारी' परिवाराने शहरातील वाचकांसाठी 'न्यू इयर डबल धमाका हमखास बक्षीस योजना' आणली आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातील वाचकांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. आठ महिन्यांसाठी ही योजना राहणार आहे.

केवळ आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसे

या योजनेच्या बक्षिसांसाठी एक-दोन वर्षे वाट पाहायची गरज नाही. केवळ आठ महिन्यांत दोन हमखास बक्षिसे वाचकांना मिळणारच आहेत. त्यासह दोन लकी ड्रॉमधूनही आणखी दोन बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

योजनेत सहभागासाठी हे करा

या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांनी जवळच्या अंक विक्रेत्याकडे आपली मागणी नोंद करावी. ५ जानेवारी २०२४ पासून अंकात प्रसिद्ध होणार्‍या दैनंदिन कूपनपैकी १२० इतकी कूपन जमा करून तक्त्यात चिकटवून ती जमा करावी लागणार आहेत.

कूपन तक्ता जमा करताच मिळणार बक्षीस

या योजनेचे एकूण दोन ड्रॉ काढण्यात येणार आहे. पहिल्या ड्रॉपूर्वी कूपन तक्ता जमा करणार्‍या सर्वच वाचकांना बाथमरूम सेट हे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. यानंतर दुसर्‍या ड्रॉपूर्वीही कूपन तक्ता जमा करणार्‍या सर्वच वाचकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे.

बुकिंगची रक्कम भरण्याची गरज नाही

या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांना कोणत्याही प्रकारचे बुकिंग करण्याची, त्याकरिता आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही. केवळ दररोज प्रसिद्ध होणारा दैनिक 'पुढारी' आपल्या घरी असणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT