अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत जन्मठेप 
कोल्हापूर

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : बारा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप सुनावली. सागर दिनकर ससाणे (रा. घोरपडे वसाहत, गडमुडशिंगी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०२२ मध्ये ही घटना घडली होती.

पीडित मुलीचे पोट पुढे आल्याचे सप्टेंबर २०२२ मध्ये एका आशा स्वयंसेविकेच्या निदर्शनास आले. तिने पीडितेची तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आशा सेविकेने याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन याची चौकशी केली असता, सागर ससाणे याने २०२० ते २०२२ या काळात अत्याचार केल्याचे समोर आले. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ ससाणेस अटक केले.

तपास अधिकारी उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी १४ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी फितूर होऊनही तिचे व्‍हिडीओ रेकॉर्डिंग न्यायालयाने ग्राह्य मानला. डॉक्टर, पीडितेची आई, पंच, आशा सेविका, अंमलदार यांच्या साक्षी, अर्भकाचे डीएनए अहवाल ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT