मूळ क्षेत्र मेतकेतील बाळूमामा मंदिर उद्या, परवा बंद File Photo
कोल्हापूर

Kolhapur News : मूळ क्षेत्र मेतकेतील बाळूमामा मंदिर उद्या, परवा बंद

सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टची माहिती

पुढारी वृत्तसेवा

हमीदवाडा : मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथे भंडारा महोत्सव व हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने स्वच्छता करण्यासाठी श्री हालसिद्धनाथ-बाळूमामा मंदिर दि. 19 व 20 रोजी दोन दिवस बंद ठेवले जाणार असल्याची माहिती सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने दिली.

स्वतः मामांनी 1932 मध्ये सुरू केलेल्या या भंडारा महोत्सवाने आता व्यापक रूप घेतले आहे. यासाठीचा हरिनाम सप्ताह 21 फेबुवारीपासून सुरू होत आहे. मुख्य भंडारा दि. 27 फेबुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी मंदिर स्वच्छ करण्यासाठी गुरुवारी (दि. 19) व शुक्रवारी (दि. 20) मंदिर, भक्तनिवास व अन्नछत्र पूर्णतः बंद राहणार आहे. दि. 21 पासून मंदिर पूर्ववत सुरू राहील याची नोंद भाविकांनी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT