Kolhapur medical conference | कोल्हापुरात शनिवारपासून वैद्यकीय परिषद Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur medical conference | कोल्हापुरात शनिवारपासून वैद्यकीय परिषद

डॉ. ज. ल. नागावकर, डॉ. शशिकांत कुलकर्णी यांचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघ कोल्हापूर तसेच असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) लैंगिकता शास्त्रावर राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल सयाजी येथे ही परिषद होणार आहे.

या परिषदेत ज्येष्ठ डॉ. ज. ल. नागावकर व डॉ. शशिकांत कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेत लैंगिक आरोग्य या विषयावर डॉ. प्रकाश कोठारी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. जे. नागावकर, सचिव रणजित किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेचे उद्घाटन शनिवारी दुपारी 2 वाजता डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. राजशेखर ब—ह्मभट्ट, डॉ. टी. एस. सत्यनारायण राव, डॉ. नारायण रेड्डी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष किरण कुर्तकोटी यांच्या हस्ते होणार आहे. लैंगिक समस्या, गैरसमज व औषधोपचार या विषयांवर डॉ. दीपक जुमानी, डॉ. पद्मिनी प्रसाद, डॉ. शिरीष मालदे मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी परिषदेचा समारोप होणार असून, दुपारी 4.30 वाजता नागरिकांसाठी मोफत खुले चर्चासत्र होईल. यावेळी डॉ. नारायण रेड्डी, डॉ. प्रसन्न गद्रे, डॉ. मानसी जैन, देवयानी एम., निरंजन मेढेकर हे लैंगिक, मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर सायकेअ‍ॅट्रिक तज्ज्ञ सोसायटी आणि कोल्हापूर युरॉलॉजिकल सोसायटी यांचे सहाकार्य लाभले आहे.

परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील, डॉ. मदन कांबळे करणार आहेत. परिषदेचे संयोजन डॉ. प्रशांत शहा, डॉ. रूपा नागावकर, डॉ. दादासाहेब पाटील, डॉ. किशोर केसरकर, डॉ. गौरी केणी करत आहेत. पत्रकार परिषदेला डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. गौरी साईप्रसाद, डॉ. इंद्रनिल जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT