महायुतीचे नगरसेवक जाणार सहलीवर File Photo
कोल्हापूर

Kolhapur Politics : महायुतीचे नगरसेवक जाणार सहलीवर

महापौर निवडणुकीसाठी पुरेसे संख्याबळ; पण धोका नको म्हणून एकत्रित राहणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः महायुतीचे नगरसेवक बुधवारी (दि. 4) सायंकाळी किंवा गुरुवारी (दि. 5) सहलीवर जाणार आहेत. शुक्रवारी (दि. 6) महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीदिवशी नगरसेवक कोल्हापुरात परत येतील. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असले, तरी कोणताही धोका नको म्हणून नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यासाठी सहलीवर नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाविकास आघाडीचे नगरसेवक मात्र कोल्हापुरातच राहणार आहेत.

महायुतीमधील भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष 1 असे एकूण 46 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीतील काँग््रेासचे 34 आणि शिवसेना ठाकरे गट 1 असे एकूण 35 नगरसेवक आहेत. महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी निकम महापौरपदासाठी, तर त्यांच्याविरोधात सचिन शेंडे यांनी अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी काँग््रेासचे दुर्वास कदम आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांच्यात लढत होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुका होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT