Solar Power  
कोल्हापूर

Solar Power ‌ : ‘रूफ टॉप‌’च्या सौरऊर्जा निर्मितीचा लागेना हिशेब

लाभार्थी ग््रााहक-महावितरण अधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रूफ टॉप सोलर योजनेत ग््रााहकांनी आपल्या छतावर निर्माण केलेल्या सौर ऊर्जेच्या हिशेबातील घोळाने ग््रााहक संतापले आहेत. आम्ही निर्माण केलेल्या सौरऊर्जेचा हिशेब कुठे आहे, अशी विचारणा होत असल्यामुळे वीज ग््रााहक आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ग््रााहकांना घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट सौरऊर्जानिर्मितीद्वारे घरगुती ग््रााहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळते. घरगुती ग््रााहकांना बँकांकडून सवलतीच्या दरात कर्ज मिळते. 10 केव्हीपर्यंत अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळते.

एक किलोवॅट प्रकल्पातून दर दहा दिवसांत 120 युनिट वीजनिर्मिती होते. गरजेपेक्षा अधिक वीज तयार झाल्याने वीज बिल शून्य होते. अतिरिक्त विजेतून उत्पन्नही मिळते; मात्र ग््रााहकांनी तयार केलेल्या सौरऊर्जेचा हिशेब लागत नसल्याची तक्रार आहे. अनेक ग््रााहक महावितरणकडे माहिती मागत आहेत. उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप ग््रााहकांतून होत आहे. एकीकडे महावितरण जादाची वीज विकत घेण्याची भाषा करीत असताना दुसरीकडे या ग््रााहकांनी तयार केलेल्या विजेचा हिशेब देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT