कोल्हापूर

खिद्रापुरात प्रेमविवाह उधळला; मुलीच्या वडिलांचा रुद्रावतार पाहून नवरदेव पळाला

अविनाश सुतार

[author title="जमीर पठाण" image="http://"][/author]
कुरुंदवाड: प्रेमाचे रूपांतर विवाहबंधनात करायचं म्हणून वयाचा फज्जा ओलांडताच चंदेरी नगरीतील प्रेमीयुगुलांनी धूम ठोकत थेट कुरुंदवाड गाठले. भटजीकडे रितसर कागद देऊन विवाहाची लगबग करू लागले. मात्र, भटजींनी तयारीसाठी ३ तासांचा अवधी दिला.
दरम्यान, नातेवाईकांना सापडू नये, म्हणून प्रेमीयुगुलासोबत आलेले मित्र आणि आत्ती-मावशी खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे देव दर्शनासाठी गेले. इतक्यात मुलगीचा वडील आला अन्…आपल्या मुलगीला झोडपायला सुरवात केली. मुलीच्या वडिलाचा रुद्रावतार पाहून मुलाची भंबेरी उडाली. सोबत आणलेली दुचाकी, मित्र आणि आत्या मावशीला सोडून दिसेल त्या रस्त्याने त्याने धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि.८) दुपारी खिद्रापुरात घडली. दिवसभर या घटनेची खमंग चर्चा रंगली होती.

हातकणंगले तालुक्यातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गावातील मामाच्या मुलगीला आत्तीच्या मुलाने पळवून आणले. त्यानंतर कुरुंदवाड नगरीत स्टॅम्प खरेदी करून लग्न सोहळा उरकण्यासाठी भटजीला भेटले. भटजींनी वेळ लागणार असे सांगितल्याने मुलीकडचे कुणीतरी पाहतील. या भीतीपोटी प्रेमी युगुल चार मित्र आणि मावशी, आत्याला घेऊन खिद्रापूर येथे देवदर्शनासाठी गेले.

मात्र, मुलीच्या नातेवाईकांना सुगावा लागताच ५० हून अधिक जणांनी मंदिर आवारात गर्दी करत मुलीचा शोध सुरू केला. मुलगी मिळून येताच तिला भर चौकातच मारहाण करायला सुरुवात केली. तिला मारहाण करत असल्याचे पाहून मुलाने आपली दुचाकी तेथेच टाकून पसार झाला. मित्रांनी ही राजापुरवाडीचा रस्ता धरत पळ काढला. तर आत्या-मावशीने म्युझियम इमारतीत दडून बसत स्वतःचा बचाव केला.

या सर्व घटनेनंतर प्रेम विवाह करण्यापूर्वी देवदर्शनासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांची नातेवाईकांनी खिद्रापुरातूनच काढलेल्या वरातीची खमंग चर्चा दिवसभर सुरू होती. सैराट सिनेमा प्रमाणे आर्ची संकटात सापडली आणि वर मुलगा परशा मात्र पसार झाला. या घटनेची कोणतीही नोंद पोलिसांत झालेली नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT