Loudspeaker permit | कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात 14 दिवस रात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार 
कोल्हापूर

Loudspeaker permit | कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात 14 दिवस रात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार

जिल्हाधिकार्‍यांची विशेष सवलत; गणेशोत्सवात 4, तर नवरात्रौत्सवात 3 दिवस

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात या वर्षभरात 14 दिवस लाऊडस्पीकर (ध्वनिक्षेपक) व अ‍ॅम्लिफ्लायर (ध्वनिवर्धक) रात्री 12 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी काढले आहेत. त्यानुसार गणेशोत्सवात चार, तर नवरात्रौत्सवात तीन दिवस मिळणार आहेत.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील नियम 5 (3) नुसार जिल्ह्यात वर्षातून 15 दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास विशेष सवलत देण्यात येते. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी 15 पैकी 14 दिवसांसाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास मान्यता दिली आहे.

जिल्हादंडाधिकारी येडगे यांनी काढलेल्या आदेशानुसार, यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 1 दिवस, शिवजयंती (पारंपरिक) - 1 दिवस, मोहरम (नववा दिवस - खत्तलरात्र) - 1 दिवस, ईद-ए-मिलाद - 1 दिवस, दहीहंडी (गोपाळकाला) - 1 दिवस, गणपती उत्सव - 4 दिवस (14, 19, 24 व 25 सप्टेंबर), नवरात्री उत्सव - 3 दिवस (11, 19 व 20 ऑक्टोबर), दीपावली (लक्ष्मीपूजन) - 1 दिवस व ख्रिसमस - 1 दिवस याप्रमाणे सूट घोषित करण्यात आली आहे.

ध्वनी प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वपरवानगी बंधनकारक

ही सवलत श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी लागू राहील. तथापि, कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ही सवलत लागू राहणार नाही. तसेच, ध्वनिक्षेपक लावण्यापूर्वी पोलिस विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT