तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur News : मित्रांसोबत गप्पा मारत उभारला अन्‌ ‘तो’ कायमचा सोडून गेला

तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; बेलबाग येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : खाद्य पदार्थांची डिलिव्हरी पोहोच करण्याचे काम आटोपून घरी जाण्यापूर्वी तो निवांत मित्रांसोबत गप्पा मारत उभारला होता. बोलता बोलता अचानकच बेशुद्ध झाला अन् मित्रांची साथ कायमची सुटली. मयूर रमेश मोरे (वय २६, रा. शिवनेरी कॉलनी, पाचगाव) याचा सोमवारी (दि. २९) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पाचगाव येथील शिवनेरी कॉलनीमध्ये मयूर आई, वडील भावासोबत राहत होता. तो खाद्यपदार्थ डिलिव्हरीचे काम करत होता. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डिलिव्हरीचे सर्व काम आटोपून तो बेलबाग येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक मयूरला अस्वस्थ वाटू लागले व तो खाली बसला. मित्रांनी त्याला पाणी देऊन १० मिनिटे शांत बसविले. यानंतर पुन्हा गप्पा मारत असताना मयूर बोलता बोलता अचानकपणे बेशुद्ध झाला. मित्रांना काही समजण्यापूर्वीच मयूर खाली कोसळला. त्यांनी मयूरला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. या घटनेची माहिती मिळताच आई- वडिलांना मानसिक धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT