नृसिंहवाडी : कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दहशत माजवणारे व अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सतीश परशराम वडर (वय ३८, रा. दत्तवाड) व सुशांत गणपती सावंत (३६, रा. अकिवाट) या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश दिला.
सतीश वडर याच्यावर २०२१ ते २०२५ या कालावधीत ७ तर सुशांत सावंत याच्यावर २०१९ ते २०२१ दरम्यान ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्याने, त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. इचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या चौकशी अहवालानंतर दंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे स.पो.नि. शीतलकुमार डोईजड यांनी सांगितले.