Maharashtra Bendur Kurundwad Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | महाराष्ट्र बेंदूर स्पर्धेत हर्षद ढाले यांच्या खोंडाची बाजी; करतोडी स्पर्धेत चांदीची गदा पटकावली

महाराष्ट्र बेंदूर समितीच्या वतीने कुरुंदवाड येथे आयोजित बिनदाती खोंडांच्या करतोडीच्या भव्य स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Bendur Kurundwad

कुरुंदवाड : महाराष्ट्र बेंदूर समिती, कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित बिनदाती खोंडांच्या करतोडीच्या भव्य स्पर्धेत हर्षद ढाले यांच्या खोंडाने प्रथम क्रमांक पटकावत रोख ₹२५ हजार आणि चांदीची गदा जिंकली. तब्बल ७५ बिनदाती खोंडांच्या सहभागामुळे स्पर्धा अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आमदार अशोकराव माने, नगराध्यक्षा मनीषा डांगे आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेत हर्षद ढाले यांनी प्रथम क्रमांक मिळवत रोख २५ हजार आणि चांदीची गदा पटकावली. तुषार कोळेकर यांनी द्वितीय क्रमांकासह रोख ₹१५ हजार व ढाल, राकेश नंदगाव यांनी तृतीय क्रमांकासह रोख १० हजार व ढाल, तर शिरोळचे गिरीश कोळी यांनी चतुर्थ क्रमांक मिळवत रोख ५ हजार आणि ढाल मिळवली.

यावेळी ॲड. धैर्यशील सुतार, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, प्रगतशील शेतकरी धनपाल पोमाजे आणि इतिहास संशोधक शशिकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, अजय पाटील यड्रावकर, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, स्पर्धेचे आयोजक तथा माजी नगरसेवक राजू आवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, रमेश भुजुगडे, दीपक परीट, तानाजी आलासे, आयेशा बागवान, रामदास मधाळे, प्रफुल्ल पाटील, संतोष शहा, जितेंद्र साळुंखे, अमित आवळे, राजू बेले, महावीर आवळे, रणजीत आवळे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुनील चव्हाण यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT