कोडोलीजवळ अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur Accident : कोडोलीजवळ अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोडोली-काखे रस्त्यावरील निवासी शाळेसमोर अपघात

पुढारी वृत्तसेवा

कोडोली : कोडोली-काखे रस्त्यावरील निवासी शाळेसमोर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मारुती कोंडिबा आमकर (वय 61, रा. वाडीहुडूंब, कोडोली, ता. पन्हाळा) यांचा मृत्यू झाला.

मारुती आमकर दुचाकीवरून रात्री कोडोलीकडे येत होते. त्याचवेळी अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, आमकर हे सुमारे 20 फूट फरफटत गेले. डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. कोडोलीत प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचार सुरू असताना सकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कोडोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. आमकर यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाले असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT