Gold Coins 
कोल्हापूर

Kolhapur News : कसबा बीड येथे सापडला सोन्याचा ‌‘बेडा‌’

8 मि.मि. व्यास व 0.74 ग््रॉम वजनाची मुद्रा

पुढारी वृत्तसेवा

शिरोली दुमाला : कसबा बीड (ता. करवीर) येथील महिला सुनीता सरदार माने यांना कोगे पाणंद रोडला संजय पाटील यांच्या शेतात उसाची लावण करत असताना सोन्याची मुद्रा म्हणजेच बेडा सापडला. यावर त्रिशुळाचे अंकण असून बेड्याचा व्यास 8 मि.मि., तर वजन 0.74 ग््रॉम इतके आहे.

कसबा बीड गावात अनेक वर्षांपासून सोन्याची नाणी, बेडा सापडल्याचा घटना घडत आहेत. सोन्याचा बेडा सापडण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. गावात पुन्हा असा बेडा सापडल्याने गाव व परिसरात सोन्याच्या पावसाची चर्चा सुरू झाली आहे. हे गाव शिलाहार राजाची उपराजधानी व लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे. बीडमध्ये सोन्याचा पाऊस पडतो अशी पूर्वीपासून अख्यायिका आहे. याचा येथील ग््राामस्थांना सतत प्रत्यय येत आहे. आजही येथे सुवर्णमुद्रा, सुवर्ण अलंकार, चांदीची नाणी, विरगळ व पाषाणी दगडी मूर्ती आणि प्राचीन मंदिराचे अवशेष सापडतात. डाळीएवढ्या लहान आकाराच्या तुकड्यावर इतके बारीक अंकण कोरण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. सापडणारे बेडे हे नेहमीच कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT