Kagal flyover tender
कागल : अनेक वर्ष कागल शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा उड्डाणपूल पद्धतीने करावा, अशी सातत्याने मागणी होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग समितीने राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली होती. याचा विचार करून उड्डाणपुलाच्या कामासाठी आज (दि.४) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाईटवर 295 कोटींचे टेंडर प्रसिद्ध झालेले आहे.
अनेक वर्षाची मागणी यामुळे मंजूर झालेली आहे. यामुळे कागल शहराचे वाहतुकीचे प्रश्न सुटण्यास मोठे सहाय्य होणार आहे. उड्डाणपूल, सर्विस रोड व शहरातले जे अनेक वाहतुकीचे प्रश्न भेडसावत होते, ते मार्गी लागतील व कागलचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
याकामी मंत्री हसन मुश्रीफ , राष्ट्रीय महामार्गाचे प्रमोदकुमार सिंग, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रयत्न केले. तसेच मंत्री गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यानिमित्त कृती समितीचे अध्यक्ष भैय्या माने व प्रकाशराव गाडेकर, उपाध्यक्ष संजय ठाणेकर यांच्यासह संजय चितारी, सौरभ पाटील, नितीन दिंडे, नवाज मुश्रीफ, सतीश घाडगे, असलम मुजावर, प्रवीण काळबर, सुनील माने, सुनील माळी, संग्राम लाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून आभार मानले आहेत.