एअर गनचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाकडे मागितली खंडणी  
कोल्हापूर

Kolhapur Crime : एअर गनचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

पैसे देण्यास नकार दिल्याने चांदीची अंगठी घेऊन पसार, अल्पवयीनसह तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भरदिवसा सराफ व्यावसायिकास एअर गनचा धाक दाखवून दहा हजार रुपयांची खंडणी मागून सात ग्रॅमची चांदीची अंगठी हिसकावून घेणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ओंकार रविकांत सोनवणे ( वय १९, रा. बापुरामनगर, कळंबा) साहिल संतोष सोळांकुरे (९, सोळांकुरे कॉलनी, आदिनाथनगर कळंबा) याच्यासह एका अल्पवयीन संशयितास अटक केली. त्यांच्याकडून चांदीची अंगठी, काळ्या रंगाची एअर गन, दुचाकी आणि मोबाइल असा एक लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली.

गोविंद शंकरजी माळी (वय ५५, रा. बालिंगा, ता. करवीर) यांचे फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील चौकात सराफी दुकान आहे. ५ नोव्हेंबरला दुपारी तोंडाला रुमाल बांधून एक जण दुकानात घुसला. त्याने खिशातील गन काढून माळी यांच्यावर रोखून दहा हजार रुपयांची मागणी केली. माळी यांनी पैसे दिले नसल्याने चांदीची अंगठी जबरदस्तीने घेऊन तो गेला होता. जुना राजवाडा गुन्हे शोध पथकाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीत तिघेजण मोपेडवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. पथकाला तिघेजण मोरे-माने नगरातील पाण्याच्या टाकीजवळ मोपेडसह थांबल्याची माहिती मिळाली. त्यांना सापळा रचून त्या ठिकाणी अटक केली. त्यांनी सराफी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT