हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील श्री रामराव इंगवले हायस्कूलमध्ये 'दैनिक पुढारी'च्या जागर स्वावलंबी शिक्षणाचा या उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील नववीची विद्यार्थिनी तनुजा बजरंग शिरगावे हिने ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वेषभूषेत सायकलवरून घरोघरी जाऊन वृत्तपत्राचे वाटप केले आणि स्वावलंबी शिक्षणाचा संदेश दिला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते अतुल मंडपे व संतोष डुणूंग उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते दैनिक पुढारीच्या अंकांचे वाचन करण्यात आले.
दरम्यान, शाळेतील मुलांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर नाटक सादर केले. वृत्तपत्र विक्रेते मंडपे यांनी विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. पी.जे.उमाजे यांनी सूत्रसंचालन केले. अनंत जानवेकर यांनी आभार मानले.
यावेळी मुख्याध्यापीका एस. एम. पाटील, पर्यवेक्षक डी. एम. रवरात आदीसह शिक्षक, वृत्तपत्र विक्रेते, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?