दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने तीन कोटींची फसवणूक 
कोल्हापूर

Kolhapur Crime : दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; 6 जणांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयित गडहिंग्लज परिसरातील

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने 2 कोटी 95 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सहाजणांना अटक केली. न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये संशयितांवर गडहिग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

रमेश गणपती शिरगावे (वय 51, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज), रणजित राजाराम रावण (42, रा. मुरगूड, ता. कागल), संतोष शिवाजी भोसले (34, औरनाळ, ता. गडहिंग्लज), तुषार सुरेश चौथे (38, साधना हायस्कूलसमोर, गडहिंग्लज), विठ्ठल मारुती जाधव (52, भीमनगर, गडहिंग्लज), सदाशिव दत्तात्रय चव्हाण (67, पिंपळगाव, ता. भुदरगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मदनकुमार बाळासाहेब शिंदे (रा. कौलगे, ता गडहिंग्लज) यांनी 4 ऑक्टोबर 2025 रोजी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यापैकी काही संशयितांना यापूर्वी अटक झाली होती. पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, वरिष्ठ निरीक्षक महेश इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT