कुख्यात ‘गोल्ड हंटर्स गँग’ला मोका 
कोल्हापूर

Kolhapur Crime : कुख्यात ‘गोल्ड हंटर्स गँग’ला मोका

आंतरराज्य टोळीला झटका; पोलिस महानिरीक्षकांची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात धुमाकूळ घालत चेन स्नॅचिंग, घरफोडीप्रकरणी २८ गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या अमरावती येथील कुख्यात ‘गोल्ड हंटर्स गँग’च्या म्होरक्यासह साथीदारावर मोका अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी प्रस्तावाला मंजुरी दिली.

वैभव नारायण आडोळे (वय २६, रा. येरळा, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या, रा. हिंजवडी, पुणे), करण गोरख गजधणे (१९, पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, छत्रपती संभाजीनगर, सध्या, रा. औंध गावठाण, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात हिसडा मारून सोन्याचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या गोल्ड हंटर्स गँग’च्या म्होरक्यासह साथीदाराला कोल्हापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी पुणे- बंगळुरू महामार्गावर शिरवळ (ता. सातारा) येथे पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT