कोल्हापूर

कोल्हापूर : तळंदगे ते पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मोबाईल चोरी प्रकरणांमध्ये वाढ

backup backup

हुपरी; अमजद नदाफ : पंचतारांकित औद्योगिक वसाहत व तळंदगे  गावातून मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांनंतर हुपरी पोलीसानी तळंदगे रूई येथील अनेक तरुणांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांना सोडवून तोडपाणी करण्यासाठी ठाण्याच्या परिसरात सकाळपासून रात्री पर्यंत भाऊगर्दी होती त्यामुळे मोबाईल चोरीची रेंज गायब तर होणार नाही ना असा प्रश्न पडला आहे.

तळंदगे जवळच पंचतारांकित वसाहत आहे. या भागात शेकडो परप्रांतिय कामगार कामासाठी आले आहेत. त्यांचे मोबाईल मोटरसायकलवरुन येऊन हिसकावून घेउन जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी या भागात मोठी टोळी जेरबंद करण्याचा आव आणण्यात आला मात्र या मोठ्या कारवाईत मोबाईलची रेंज गायब झाल्यामुळे अनेकाना क्लीन चिट देण्यात आली. तसेच काहीसा प्रकार सध्या घडत असल्याचे चित्र.आहे .

बुधवारच्या घटनेनंतर पोलिसांनी अनेक तरुणांना मोबाईल रिपेअरी विक्री करणाऱ्यांना ठाण्यात आणले. मात्र या प्रकरणात सोडवायला येणाऱ्यांची आणी मलिदा देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे या ही मोबाईल प्रकरणाची रेंज जाणार अशी चर्चा आहे. मात्र अशा प्रकारामुळे चोरी करणाऱ्यांना अभय मिळत असुन या घटना वाढू लागल्या आहेत .त्यामुळे जिल्हापोलिस प्रमुख यानी या घटनेत लक्ष घालून संबधीताच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे .

सोने प्रकरणात कोणाची आटनी?

दरम्यान दोन दिवसापूर्वी हुपरी पोलिसांनी शहरातील तिघांना चौकशी साठी ताब्यात घेतले होते .सोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर प्रक्रिया करने ती विकणे असे ते गुन्हे होते मात्र दोन तीन दिवस दिवस रात्र चौकशी केल्यानंतर त्या तिघांना क्लीन चिट दिली गेली .त्यामुळे या प्रकरणात नेमकी आटनी कुणाची काढली हा प्रश्न शहर परिसरात चर्चेचा बनला आहे .

SCROLL FOR NEXT