मालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड 
कोल्हापूर

Kolhapur Hotel Vandalism : मालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड

सीसीटीव्ही कॅमेरे फोडून रस्त्यावर भिरकावले : वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रिलायन्स मॉलसमोरील स्वस्तिक हॉटेलच्या मालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, हॉटेलची तोडफोड करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी रस्त्यावर धुलाई केली.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेबरोबर हॉटेल चालकाचा वाद झाला. या रागातून महिलेच्या मुलाने हॉटेलमध्ये जाऊन मालकाला बेदम मारहाण केली. हॉटेलमधील काऊंटर आणि टेबल उलथावून टाकली. वस्तूंची तोडफोड केली. हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर दगड घालून तोडफोड केली. कॅमेरे रस्त्यावर भिरकावण्यात आले. संतप्त तरुणाचा 40 ते 45 मिनिटे धुडगूस सुरू होता. या घटनेमुळे बघ्याची मोठी गर्दी झाली होती. फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज मार्गावरील वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरीचे पोलिस दाखल झाले. धुडगूस घालणाऱ्या तरुणाची पोलिसांनी पिटाई केली. मात्र, याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकाने रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल केली नव्हती. या घटनेवर परिसरात उलटसुलट चर्चा चालू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT