हायकोर्ट सर्किट बेंच शुभारंभ नियोजनासाठी विविध समित्या 
कोल्हापूर

Kolhapur : हायकोर्ट सर्किट बेंच शुभारंभ नियोजनासाठी विविध समित्या

जिल्हा बार असोसिएशन बैठकीत नियोजनावर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या हायकोर्ट सर्किट बेंचचा शुभारंभ रविवारी (दि. 17) होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या विशेष बैठकीत समारंभाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी न्याय संकुलात राजर्षी शाहू सभागृहात ही बैठक पार पडली.

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून हायकोर्ट सर्किट बेंचमुळे पदाधिकार्‍यांची जबाबदारी वाढली आहे. शुभारंभ सोहळा कोल्हापूरला साजेशा भव्य-दिव्य वातावरणात होण्यासाठी पदाधिकार्‍यांसह सिनिअर, ज्युनिअर वकिलांनी जबाबदारी स्वीकारून काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी झालेल्या बैठकीनुसार स्वागत समिती, समन्वय समिती, विशेषांक प्रकाशन समिती, व्यासपीठ व्यवस्थापन समिती, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी शुभारंभासाठी उपस्थित राहणार असल्याने त्यांचे स्वागत व राहण्याची व्यवस्था करण्याची समिती, मीडिया समन्वय समिती, कार्यक्रम व्यवस्थापन समिती, नोंदणी समिती अशा विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध समित्यांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी आपली नावे तत्काळ जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयात नोंद करावीत, असेही आवाहन अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांनी केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे, यासाठी प्रदीर्घ लढा सुरू होता. त्याला यश आले आहे. हा कोल्हापूरकरांसाठीच नव्हे, तर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जनतेसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे. यामुळे सर्किट बेंंच शुभारंभाचा कार्यक्रम अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य व्हावा, याकरिता खंडपीठ कृती समितीने कंबर कसली आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT