कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस

backup backup

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : लांबलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रामध्ये पावसाने धुवाँधार बँटींग सुरु केली आहे. जिल्ह्यातील पाटगाव,तुळशी,कुंभी आणी कोदे धरणक्षेत्रामध्ये पावसाने आठ दिवसातच गतवर्षीच्या मिली मीटरच्या हिशोबाने हजेरी लावली आहे. पावसाने उशीरा हजेरी लावत गतवर्षीच्या पावसा इतकीच आठ दिवसात हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात तर पावसाचा जोर वाढला आहे. दुपारनंतर तर हा जोर अधिक प्रमाणात वाढत आहे.

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे, कंसत दि.१ जुन २०२३ पासुनचा एकुण पाऊस मि.मी.मध्ये:- राधानगरी ३९(३९८),तुळशी५१(२१६),वारणा१५(१४८),काळम्माडी१७(२५८),कासारी ८२(५५४),कडवी ४६(२८४),कुंभी ८६(६५८),पाटगाव ८५(८०४),चिकोत्रा १०(११३),चित्री २०(१५३),जंगमहट्टी १५(१११),,घटप्रभा ४७(५४८),जांबरे ३५(३१०),आंबेओहोळ ११(५४),कोदे ९१०(५४५) प्रामुख्याने राधानगरी, तुळशी,कुंभीसह पाटगाव धरणक्षेत्रामध्ये पावसाची दमदार बँटींग सुरु आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावसाने आठ दिवसातच गतवर्षीच्या  पावसाचा वजावटा काढला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT