कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी भाविक छत्रीचा आधार घेताना दिसत होते.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Kolhapur weather update | कोल्हापुरात उन्हाचा चटका अन् वादळी वार्‍याचा तडाखा; आजही पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात सध्या हवामानाचा दुहेरी खेळ पाहायला मिळत आहे. दिवसभर कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत असतानाच, शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वारे वाहू लागले. दुपारच्या वेळी कमाल तापमान 36.6 नोंदवले गेले असून, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. सायंकाळी आकाशात ढग दाटून आल्याने मोठ्या पावसाची चिन्हे होती; मात्र पावसाने हुलकावणी दिली आणि काही भागांत केवळ हलक्या सरींचा शिडकावा झाला.

वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोल्हापूरकर सनकोट, टोपी, छत्री आणि स्कार्फचा आधार घेताना दिसत आहेत. शुक्रवारी किमान तापमान 24.9 इतके राहिले, जे सरासरीपेक्षा 2.4 अंशांनी जास्त आहे. हवेत आर्द्रता असल्याने दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्याने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला असला, तरी पावसाने पाठ फिरवल्याने आर्द्रता वाढून उकाडा अधिकच तीव— झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारी (दि. 9) देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT