हावेरीजवळ अपघातात शिरढोणचा तरुण ठार 
कोल्हापूर

Kolhapur Accident : हावेरीजवळ अपघातात शिरढोणचा तरुण ठार

दोघेजण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : कर्नाटकातील हावेरीजवळ सोमवारी रात्री एकच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्यालगतच्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटले. या अपघातात अभिजित आदिनाथ शंभूशेट्टी (वय ३३, शिरढोण ता. शिरोळ) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हावेरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अभिजित शंभूशेट्टी व त्यांचे नातेवाईक कबड्डीचे सामने पाहण्यासाठी हावेरी येथे गेले होते. रात्री सामना संपल्यानंतर ते चारचाकी वाहनातून परतताना हावेरीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वाहन रस्त्यालगत असलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर जोरात आदळून उलटले. इचलकरंजी येथे खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या अभिजित यांच्या जाण्याने पत्नी व दोन चिमुकल्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT