Gram Panchayat Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Gram Panchayat Election : 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू

डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या वर्षभरात मुदत संपणाऱ्या 433 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासह राज्यातील यावर्षी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुका, त्यानंतर महापालिका निवडणुका आणि या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुदत संपलेल्या ग््राामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर जातील, अशी शक्यता होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या मुदत संपणाऱ्या ग््राामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्ह्यात 2024 या वर्षी मुदत संपलेल्या 22 आणि 2025 या वर्षी मुदत संपलेल्या 3 अशा 25 ग््राामपंचायतीसाठी यापूर्वीच प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील मुदत संपणाऱ्या 433 ग््राामपंचायतीसाठी आता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानूसार प्रारूप प्रभाग रचना दि.7 एप्रिल रोजी जाहीर केली जाईल. त्यावर येणाऱ्या हरकती, सूचनांवर निर्णय घेऊन 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानूसार दि.20 फेबुवारी पर्यंत तहसीलदार गुगल अर्थवरून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर दि.27 फेबुवारी पर्यंत तलाठी व ग््राामसेवक संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, त्यानूसार त्याच्या सीमा निश्चित करणार आहेत. दि.5 मार्च अखेर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दि.11 मार्च पर्यंत या समितीकडून आलेला प्रारूप प्रभाग रचनांचा प्रस्ताव प्रातांधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावांची छाननी करून,योग्य त्या दुरूस्ती करून जिल्हाधिकाऱ्यांना 17 मार्च पर्यंत हे प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागतील. यानंतर आयोगाकडून दि.27 मार्चपर्यंत या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून 30 मार्चपर्यंत मान्यता दिली जाईल. यानंतर दि.7 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यावर दि.13 एप्रिलपर्यंत हरकती व सूचना देता येणार आहेत. त्यावर दि.21 एप्रिलपर्यंत प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी हे प्रस्ताव दि.23 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातील. दि.28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवणार आहे. यानंतर आयोगाने मान्यता दिल्यानंतर दि.4 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT