प्रशासक, दूध संस्‍थांचीही हरकत फेटाळली Pudhari News Network
कोल्हापूर

Kolhapur News : प्रशासक, दूध संस्‍थांचीही हरकत फेटाळली

सहकार न्‍यायालयात ४१० संस्‍था सभासदत्व रद्दबाबत आज पुन्‍हा सुनावणी : अवसायनातील संस्‍थांची सुनावणी ४ ऑगस्‍टला

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : सहकार न्‍यायालयाने गोकुळ प्रशासकांसह दूध संस्‍थांचीही हरकत मंगळवारी झालेल्‍या सुनावणीत फेटाळली. ४१० दूध संस्‍थांच्‍या सभासदत्व रद्दसंदर्भात बुधवारी (दि. २२) पुन्‍हा सुनावणी ठेवली आहे. तर कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये अवसायनातील दूध संस्‍थांच्‍या याचिकेवर पुढील सुनावणी ४ ऑगस्‍टला ठेवली आहे.

गोकुळच्‍या सभासदत्व रद्द करण्‍यासंदर्भात नोटीस बजावलेल्‍या ४१० दूध संस्‍थांनी सहकार न्‍यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्‍यान गोकुळ प्रशासकांनी दूध संस्‍थांना केवळ नोटीस बजावली आहे. त्‍यांच्‍यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, त्‍यामुळे त्‍यांना न्‍यायालयात जाता येणार नाही, अशी हरकत नोंदवली होती. न्‍यायालयाने प्रशासकांची ही हरकत फेटाळून लावली.

प्रशासकांनी ४१० दूध संस्‍थांना नोटीस पाठविण्‍यासाठी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. तो रद्द करावी, अशी दूध संस्‍थांनी मागणी केली होती. न्‍यायालयाने दूध संस्‍थांचीही हरकत फेटाळून लावली. तर याप्रकरणी आज पुन्‍हा सुनावणी ठेवली आहे. त्‍यामुळे न्‍यायालय काय निर्णय घेणार याकडे दूध संस्‍थांचे लक्ष असणार आहे. अवसायनातील १९० दूध संस्‍थांनी सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी अवसायनाचा आदेश कायम केलेल्‍या आदेशाविरोधात मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये धाव घेतली. मंगळवारी न्‍यायालयात सुनावणी झाली. पण न्‍यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी ४ ऑगस्‍टला ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT