Kolhapur Gokul news Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul News : ‘गोकुळ’चा अध्यक्ष उद्या ठरणार; महायुतीची भूमिका महत्त्‍वाची

गोकुळ शिरगाव येथे सकाळी ११ वाजता बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’ची अध्‍यक्ष निवड गुरुवारी (दि. २९) होत आहे. निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी कोरमचा तांत्रिक मुद्दा उपस्‍थित झाला आहे. कोरम पूर्ण करण्‍यासाठी महायुतीची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. यासंदर्भात बुधवारी महायुतीची बैठक होण्‍याची शक्‍यता असल्‍याने आजचा दिवस महत्त्‍वाचा ठरणार आहे.

गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात सकाळी ११ वाजता अध्‍यक्ष निवडीच्‍या बैठकीला सुरुवात होईल. दरम्‍यान, आ. सतेज पाटील यांनी अध्यक्ष निवडीत मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. बहुमताचा आदर राखून लोकशाही प्रक्रियेनुसार निवड व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. महायुतीच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून अध्यक्ष निवडीच्या सभेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

‘गोकुळ’चे शिल्पकार दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर यांना मागील काळात अध्यक्ष करण्याची आपली, मंत्री हसन मुश्रीफ आणि आ. विनय कोरे यांची इच्छा होती; पण ते अध्‍यक्ष होऊ शकले नाहीत. आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्री मुश्रीफ व आ. कोरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आ. सतेज पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT